धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हयातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान महाडीबीटी प्रणालीद्वारे वितरीत करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. या प्रणालीद्वारे राज्य पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.त्यामुळे सर्व लाभार्थ्यांची माहिती तहसिलदार यांच्याकडून महा डीबीटी पोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना  सन 2024-25 चे अर्थसहाय्याचे वितरण महाडीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.ज्या लाभार्थ्यांची माहिती महाडीबीटी  पोर्टलवर भरण्यात येणार नाही अशा लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागेल. तरी जिल्हयातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेमधील सर्व लाभार्थ्यांनी त्यांच्या आधारकार्डची झेरॉक्स प्रत व आधार संलग्न बँक पासबुकची एक प्रत गावच्या तलाठयाकडे किंवा संबंधित तहसिल कार्यालयात 18 जून 2024 पर्यंत जमा करावी.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केले आहे.

 
Top