भूम (प्रतिनिधी)-भूम शहर व परिसरात बकरी ईद सण उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी वाशी रोडवरील इदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठण करण्यात आले. यंदा चांगला पाउस पडू दे, धन धान्य पिकू दे, सर्वत्र शांतता नांदू दे अशी प्रार्थना अल्लाहाकडे करण्यात. यावेळी मोठ्या संख्येन मुस्लिम बांधव एकत्रीत येत एकमेकास बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिस निरिक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


 
Top