तुळजापूर (प्रतिनिधी)-  खरीप पेरणी पुर्वतयारी कामे सुरु झाल्याने श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ शेतकरी भाविकांची संख्या घटलेली असतानाही रविवार सुट्टी दिवस असल्याने शहरी भागातील भाविकांनी श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ गर्दी केली होती. मंगळवार लोकसभा निवडणुक मतमोजणी प्रक्रिया असल्याने नोकरदार भाविक कमी होणार आहेत.

आज शहरातील तापमान घटल्याने असाह्य उकाड्यापासुन भाविकांना सुटका मिळाली.  रविवारी सुमारे लाखभर भाविकांनी श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनाचा लाभ घेतला. दिवसभर धर्म, अभिषेक, मुख पेड दर्शन रांगा भाविकांनी भरून गेल्या होत्या. पाऊस पडल्यानंतर भाविकांचा ओघ आणखी कमी होणार आहे.

 
Top