तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरातील घाटाजवळ  हॉटेल सन ऑफ सन वसुधरा भावनाच्या पाठीमागे झाडांमध्ये अंदाजे 30 ते 35 वर्षाच्या अज्ञात अनोळखी युवकाचा दिनांक एक जून रोजी सायंकाळी साडेचार पाच वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोलापूर तुळजापूर रस्त्यावर घाटाजवळ सन ऑफ सन हे हॉटेल असून, त्या बाजूला वसुधारा सांस्कृतिक भवन आहे. दिनांक एक जून रोजी सायंकाळी साडेचार पाच वाजण्याच्या सुमारास तेथील मॅनेजर हे हॉटेलवर बसले असताना दुर्गंध युक्त वास येत असल्यामुळे सदर ठिकाणी जाऊन पहाणी केली. सदर ठिकाणी 30 ते 35 वर्षाचा अनोळखी युवक मृत अवस्थेत पडला असल्याचे दिसून आले. सदर मृतदेह अंदाजे तीन दिवसापूर्वी असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सदर मृतदेहाच्या अंगावर आभाळी कलरचा शर्ट व पिवळ्या रंगाचा बर्मुडा असल्याचा दिसून आले. तर चेहरा विद्रूप स्वरूपाचा असल्यामुळे ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हानच असणार आहे .

सदर घटनेची खबर विवेक वसंतराव पाटील वय 46 वर्ष राहणार सोलापूर यांनी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या खबरे वरून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव,पोलीस हवालदार कमलकिशोर राऊत,पोलीस हवलदार विलास माळी,पोलीस कॉन्स्टेबल महेश सावरे, चालक प्रमोद रोटे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सदर मृतदेह उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले आहे.


सदर मृत अनोळखी व्यक्तीचा नातेवाईकांचा शोध सुरू असून ओळख पटल्यानंतर सदर मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यात येणार असून सदर मृतदेह हा नातेवाईकांची ओळख पटेपर्यंत उपजिल्हा रुग्णालय येथील डीप फ्रीज मध्ये ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असून नागरिकांमधून विविध चर्चा व्यक्त होत आहे. तर याबाबत अधिक पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव करत आहे.

 
Top