धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात शुक्रवार दिनांक 21 जुन 2024 रोजी जागतिक योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. डॉ. मेघश्याम पाटिल यांनी योग प्रात्यक्षिक सादर केले. सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी उपकुलसचिव भगवान फड, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. राहुल खोब्रागडे, कमवा व शिका योजना समन्वयक डॉ. गोविंद कोकणे, जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. जितेंद्र कुलकर्णी, वरिष्ठ सहाय्यक चंद्रकांत आनंदगावकर, ग्रंथालय सहाय्यक तुकाराम हराळकर, सिद्धेश्वर नेटके, हेमंत रसाळ, सचिन रसाळ, कर्मचारी इ. उपस्थित होते.

 
Top