परंडा (प्रतिनिधी) - परंडा तालुक्यातील शालेय विद्यार्थ्याना तात्काळ गणवेश वाटप करा अशी मागणी माजी आमदार राहूल मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजीक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली  गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे शुक्रवार दि.21 जून रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

गट शिक्षणाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी एक राज्य एक गणवेश जाहीर केल्याप्रमाणे शिक्षण विभाग यांनी एक शासन निर्णय जाहीर केला. त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. शाळा सुरू होऊन आठवडा होऊन गेला मात्र विद्यार्थी, विद्यार्थीनींना अद्याप गणवेश वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे पालक वर्गात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी,विद्यार्थीनींना पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. या सोबतच गणवेशाचे विद्यार्थी, विद्यार्थीनीना वाटप होईल अशी अपेक्षा पालकांना होती मात्र त्यांची अपेक्षा फोल ठरली आहे.

या महिना अखेर पर्यंत विद्यार्थ्याना गणवेश वाटप न झाल्यास राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने गट शिक्षण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची जबाबदारी आपल्या कार्यालयावर राहील असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे, तालुकाध्यक्ष विक्रम जाधव, तालुका कार्याध्यक्ष रंगनाथ ओहाळ, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे खय्युंम तुटके, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अल्पसंख्याकचे गनी भाई हावरे, खानापूर ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत परीहार, श्रावण गणगे,महादेव मारकड, विजय काळे, भाग्यवंत परिहार, रामा भोसले, संजय यशवद, गणेश चव्हाण,नामदेव काळे आदी उपस्थित होते.

 
Top