कळंब (प्रतिनिधी)- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कळंबचे सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ व द्वारका हॉस्पिटल कळंबचे संचालक डॉ. सत्यप्रेम वारे यांचा लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. रामकृष्ण लोंढे बालरोगतज्ञ विजया नर्सिंग होम कळंब यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा व समाजभूषण पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

डॉ. सत्यप्रेम वारे यांनी वैद्यकीय सेवा करत असताना समाजातील विविध घटकांना शिक्षण घेण्यासाठी जागृत करून, समाजातील विविध विषयांवर काम केले असून आरक्षण प्रश्नावर सुध्दा काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला. यावेळी रमेश लोकरे, पत्रकार संभाजी गिड्डे, आप्पासाहेब कस्पटे, भानुदास कोकाटे, नानासाहेब कवडे, अनिल पवार, रमेश शिंदे, पांडुरंग कवडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अशोक शिंपले यांनी केले. सूत्रसंचलन पिंटू लगसकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन आप्पासाहेब कस्पटे यांनी केले.


अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कळब शहर कष्टकऱ्या मजुरांचा एक लाख रुपयांचा अपघाती विमा हा युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष शशिकांत निरफळ यांच्या संकल्पनेतून 100 मजूर लोकांचा विमा काढला. यावेळी पांडुरंग कुंभार, बालाजी निरफळ, शीतलकुमार घोंगडे, सचिन काळे, रोहित कसबे, अनिल शिंपले, रोहित हारकर, बळीराम चव्हाण, निर्भय घुले आदि उपस्थित होते.

 
Top