भूम (प्रतिनिधी)-गुरुवर्य भिमराव बाबुराव घुले यांच्या संकल्पनेतून व भूमिपुत्र डॉ.राहुल भिमराव घुले यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.23/06/2024 रोजी मौजे सोनेवाडी ता.भूम येथे गुरुवर्य भिमराव बाबुराव घुले यांच्या हस्ते 97 जेष्ठ नागरिकांना मोफत आधाराच्या काठीचे वाटप करण्यात आले. यावेळी बाबुराव श्रीरंग साठे यांच्या हस्ते भिमराव घुले सरांचा सन्मान करण्यात आला. लावंड यांचा सत्कार गंपू येडे यांनी केला. यावेळी सरपंच सतीश उत्तम सोन्ने यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमांबद्दल मौजे सोनेवाडी ग्रामस्थांनी भुमिपुत्र डॉ.राहुल घुले यांचे आभार व्यक्त केले.


 
Top