तेर (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांनी शेती उत्पादनासाठी अनावश्यक खर्च करू नये असे आवाहन मुर्टा येथील शेतीनिष्ठ शेतकरी सत्यवान सूर्यवंशी यांनी केले.

धाराशिव तालुक्यातील तेर दुरक्षेत्र येथे शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

अध्यक्षस्थानी ढोकी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे हे होते. पुढे बोलताना शेतीनिष्ठ शेतकरी सत्यवान सूर्यवंशी म्हणाले की, शेतकरी पेरणी करताना रासायनिक खताचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्यामुळे शेती नापीक होत चालली आहे. रासायनिक खत व रासायनिक औषधे यामुळे विषारी अन्नधान्य उत्पादन तयार होत आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करून पाण्याचे पिकनिहाय नियोजन करून स्वतः शेतात कष्ट करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असे प्रतिपादन केले.

यावेळी शेतीनिष्ठ शेतकरी पांडुरंग डोलरे, महेश जमाले, सेंद्रिय शेती मार्गदर्शक श्रीजीत इंगळे, कृषि सहाय्यक धवण शिनगारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलिस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले यांनी केले. यावेळी 15 शेतकऱ्यांना पेरणीसाठी बियाणांच्या पिशवीचे वाटत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिट अंमलदार प्रदिप मुरळीकर, पोहेकॉ. संजय भंडारकवढे, पोना. प्रकाश तरटे यांनी परिश्रम घेतले. यावेळी पोलिस पाटील फातेमा मनियार, सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, नवनाथ नाईकवाडी, महादेव खटावकर, माजी उपसरपंच मज्जित मनियार, रतन नाईकवाडी, विठ्ठल कोकरे व शेतकरी उपस्थित होते.

 
Top