परंडा (प्रतिनिधी)- तालुक्यातील सिरसावचे रहिवाशी नागनाथ महादेव चोबे यांना कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. चोबे यांना शिवाजी विद्यापीठाच्या मानवी शास्त्र विद्याशाखे अंतर्गत राज्यशास्त्र विषयातील पीएचडी 7 जून रोजी जाहीर करण्यात आली. त्यांनी प्रचार्य डॉ. शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील भूमिपुत्राचे राजकारण: विशेष संदर्भ मुंबई' या विषयावर सविस्तर मांडणी करत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे शोध प्रबंध सादर केल. चोबे हे सध्या आर्ट अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

 
Top