धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शिक्षणमहर्षी दलित मित्र डॉ. बापूजी साळुंखे यांची जयंती दिनांक 9 जून 2024 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.विद्या देशमुख यांच्या शुभहस्ते शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून डॉ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी नॅकचे समन्वयक डॉ. एस. एस. फुलसागर, कार्यालयीन प्रबंधक दिलीप लोकरे आदींसह सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

 
Top