परंडा (प्रतिनिधी) - शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना तालुक्यातील मौजे टाकळी येथे घडली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून परंडा पोलीस स्टेशनमध्ये 9 आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे टाकळी येथील एका शेतजमिनीचा वाद गेल्या काही दिवसांपासून  सुरू होता. त्यातून दोन गटांत हाणामारी झाली. संतोष घोगरे (रा.जवळा नि.), रामभाऊ भोरे, दादा भोरे रा. टाकळी यांनी  फिर्यादी राधिका भोरे व जयश्री भोरे रा. टाकळी यांना मारहाण केल्याची तक्रार परंडा पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे. फिर्यादी संतोष घोगरे व इतर यांच्या फिर्यादीवरून आरोपी राधिका भोरे व अन्य आरोपीवर शेतीच्या वादातून मारहाण केल्याची तक्रार दाखल झाली असून या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील सुमारे 9 आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.

 
Top