परंडा (प्रतिनिधी)-पेरणीसाठी आवश्यक असलेल्या खतांचा तुटवडा जाणवत असल्याने शेतकरी हवालदिल झाले असल्याचे दिसून येत आहे. 

शहर परिसरात खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाले असून, बी-बियाणे व खतांची जुळवाजुळव करण्यासाठी बाजारात येत आहेत. मात्र पेरणीसाठी आवश्यक डीएपी व इतर खतांचा तुटवडा जाणवत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच विशिष्ट कंपनीच्या बियाणे घेण्याकडे कल दिसून येत आहे. पेरणीसाठी खतांचा पुरवठा योग्य प्रमाणात होणे आवश्यक आहे. परंतु सदर खते बाजारात उपलब्ध नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सदरची खते तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी होत आहे.

 
Top