धाराशिव (प्रतिनिधी)- शिवसेना पक्षाचा वर्धापनदिन धाराशिव शहर शिवसेनेच्या वतीने जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करुन साजरा करण्यात आला. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या धोरणाला अनुसरुन बुधवारी (दि.19) शिवसेना (ठाकरे गट) शहर शाखेच्यावतीने शहरातील न.प. शाळा क्र. 18 मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सकाळी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष प्रदीप साळुंके, राजाभाऊ घोडके, दत्ता बंडगर, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, शहर संघटक प्रशांत साळुंके, उपशहरप्रमुख बंडू आदरकर, विजय ढोणे, सुरेश गवळी, बाळासाहेब काकडे, राजाभाऊ पवार, रवी वाघमारे, तुषार निंबाळकर,प्रदीप मुंडे, अफरोज पीरजादे, हनुमंत देवकते, पांडु भोसले, पंकज पाटील, शाळेचे मुख्याध्यापक घंटे, भोईटे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top