भूम (प्रतिनिधी)- भूम, परंडा, वाशी या तालुक्याला लागलेला मागासपणाचा धप्पा पुसायची हिम्मत जर असेल तर त्यासाठी शिक्षणाचा पाया माणुसकीच्या नात्याने पुढे घेऊन जायची जिद्द आपल्यात असली पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार संजय मिस्कीन यांनी केले. 

भूम तालुका पत्रकार संघ व राहुल घुले मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने भूम येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ वेळी मिस्कन बोलत होते. यावेळी आरोग्य दूत राहुल घुले यांनी सांगितले की, भूम तालुक्यातील विद्यार्थ्यांनी डॉक्टर बनून आपल्या मातृभूमीची सेवा करण्यासाठी याच भागात यावे. यावेळी शिक्षण महर्षी आर. डी. सूळ, भीमराव घुले, गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी, पत्रकार पांडुरंग मस्के, अध्यक्ष धनंजय शेटे उपस्थित होते. तालुक्यातील इयत्ता दहावीच्या 35 शाळेतील 115 प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकासहित सत्कार करण्यात आला. व तालुक्यातील बारावी उत्तीर्ण 6 महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या 24 विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी पत्रकार संघाचे नंदकुमार देशमुख, गौस शेख, विश्वनाथ फल्ले, सुनील डुगरवाल, आशिष बाबर, अजित बागडे, अरविंद शिंदे, प्रल्हाद आडागळे, उदय साबळे व राहुल घुले, आरोग्य मित्र परिवाराचे सदस्य व शिक्षक, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलीम यांनी तर आभार गौस शेख यांनी मानले. 

 
Top