कळंब (प्रतिनिधी)- येथील बस स्थानकातील नगर परिषदेच्या नाल्याद्वारे बस स्थानकात सोडण्यात आलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे हे सर्व घाण पाणी बस स्थानकातील दुकानदाराच्या समोरच मोठमोठे तळे साचल्याने आहे. यातून सुटणारी दुर्गंधी व त्यापासून पसरणारी रोगराई याबाबत आगारप्रमुखांना तोंडी व लेखी पत्र देऊन आस्थापनाधारकांनी वेळोवेळी मागणी केली. पण त्याची दखल आजवर कुठेही घेतली गेली नाही. आगार प्रमुखांनी या पाण्याबाबत नगर परिषदेला वेळोवेळी पत्र लिहून सुद्धा नगर परिषदेने आगार प्रमुखाच्या पत्राला चक्क केराची टोपलीच दाखवून दिली आहे.

यामुळे संतप्त झालेल्या आस्थापनाधारकांनी चक्क आगार प्रमुख द्वारे विभाग नियंत्रक यांना तातडीचे पत्र पाठवून नगरपरिषदेच्या घाण पाण्याचे व्यवस्था व बस स्थानकात दुकानासमोर लावलेली अवैधरीत्या वाहने यांच्यावर सुद्धा कारवाई करावी असे पत्र पोलीस ठाणे प्रमुखांना दिले आहे. काही वेळेस खड्ड्यातील दगड बसच्या चाकाखाली आल्याने अनेक प्रवाशांना हाकणाक उडणाऱ्या दगडाचा मार खावा लागत आहे. या धुळीमुळे अनेक प्रवाशासह आस्थापनाधारकांना टी. बी.  दृश्य रोग उद्भव्वु शकतो. त्याचप्रमाणे आस्थापनाधारकाने विक्रीसाठी ठेवलेल्या मालावर धूळ साचली जाते. यामुळे रोगराई पसरण्याची भीती प्रवाशातून व्यक्त केली जात आहे.  त्याचप्रमाणे या धुळीमुळे आस्थापनाधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.  या उठणाऱ्या धुळीचा रा. प. प्रशासनाने तात्काळ कायमस्वरुपी बंदोबस्त करावा अशी मागणी सर्व आस्थापनाधारकांनी या निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर विलास मुळीक, बब्रुवान शिंदे, अल्ताफ सय्यद, दत्तात्रय उमाप, एम.जे. लोकरे, बी.एच.चोरघडे, अकिब पटेल, मुकीब पटेल, दिलीप चालक, सोमनाथ सुरवसे, करीम पठाण, प्रसाद करवलकर आदींच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावरती आहेत.

 
Top