तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेत्र तुळजापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या नळदुर्ग स्थित बोरी प्रकल्पावर असणाऱ्या ट्रान्सफॉर्मर मधील केबलमध्ये प्रॉब्लेम  झाल्याने  रविवारी गर्दी दिवशी शुक्रवार पेठ सह अन्य भागात होणारा पाणीपुरवठा न झाल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. याचा फटका भाविकांसह नागरिकांना बसला.यंदा उन्हाळ्यात वीज, पाणी वितरण बाबतीत भाविकांसह नागरिकांना प्रचंड ञास सहन करावा लागला.

तिर्थक्षेत्र तुळजापूरला तीन दिवसाआड पाणीपुरवठा होता. सध्या भाविकांची प्रचंड गर्दी असल्याने पाणी मागणी वाढली. शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे नळदुर्ग स्थित बोरी प्रकल्पावर तुळजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर मधील  केबल मध्ये  प्रॉब्लेम  झाल्याने वीजेअभावी  शुक्रवार पेठ  सह अन्य शेजारील भागाला रविवारी होणारा पाणीपुरवठा झाला नाही. मात्र पाणीपुरवठा होणार नाही याची सुचना न दिल्याने शहरवासिय रविवार पाणीपुरवठा होणार म्हणून गाफील राहिल्याने रविवार पाणीपुरवठा न झाल्याने  शुक्रवार पेठ भागात वास्तव्य करणारे भाविक,शहरवासिय यांना तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागले.

तसेच रविवार याच भागातील वीज पुरवठा बराच वेळ खंडीत झाल्याने पाणी वीजेअभावी भाविकांसह नागरिकांना अनेक गैरसोयीना सामोरे जावे लागले. तिर्थक्षेत्र तुळजापूरला उन्हाळ्यात पाणीवीज सारख्या मुलभुत सुविधा पुरविण्यास असमर्थ ठरल्याने याचा फटका भाविकांना आर्थिक रुपाने बसल्याने भाविकांनी या बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त करीत होते. सांयकाळी पावसाने प्रारंभ केल्याने भाविकांच्या गैरसोयीत आणखी भर पडली.

 
Top