तुळजापूर (प्रतिनिधी)- उन्हाळा सुट्यांच्या अखेरच्या टप्यातील  मंगळवार  दि11 रोजी भरपावसात  श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ गर्दी केली होती. महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ  यंदाच्या उन्हाळ्यात  विक्रमी गर्दी झाली होती. भाविकांची संख्या वाढत असताना मुलभुत सोयीसुविधात वाढ होणे गरजे असताना त्या न वाढल्याने  परिणामी याचा जबरदस्त फटका सर्वसामान्य वर्गातील भाविकांना बसला. पण याची दखल घेण्यास ना प्रशासनाला ना राज्यकर्तांना वेळ नाही. निवडणुक संपल्यानंतर परिस्थिती सुधारेल असे वाटत असताना परिस्थिती जैसे थेच आहे. 

श्रीतुळजाभवानी सुलभ दर्शन न घडणे, अतिक्रमणीत रस्ते, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, अस्वछता, स्ञी शौचालय, स्वछतागृहांची कमतरता, महिला दागदागिने चोऱ्या प्रमाणात वाढ यासह असंख्य गैरसोयीना श्रीतुळजाभवानी दारी सामोरे जावे लागत आहे. सर्वसामान्य तिर्थक्षेञी सर्वसामान्य झाला आहे. प्रामुख्याने पुजारी मंडळे गैरसोयी शिस्त बाबतीत निवेदन थेट जिल्हाधिकारी यांना दिले. तरीही येथील प्रमुख अधिकारी दखल घेण्यास तयार नाहीत.

मंगळवार शुक्रवार रविवार पोर्णिमा या गर्दी दिनी प्रचंड  गर्दी होत होती.  शाळा 15 जूनला चालु होवुन उन्हाळी सुट्यां संपणार असल्याचा पार्श्वभूमीवर  मंगळवार  पहाटे एक वाजल्या पासुन दर्शनार्थ भाविकांनी गर्दी केली होती. मृग नक्षत्र बरसल्याने शेतकरी वर्गाने श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ येवुन दर्शन करुन मग खरीप पेरणी कामास लागला.


मृग नक्षञ बरसले देवीस वारा घालणे झाले बंद 

श्रीतुळजाभवानी मातेस असाह्य उकाड्यापासुन सुटका होण्यासाठी मखमली कपड्याच्या तयार केलेल्या पंख्याने गुढीपाडवा दुसऱ्या दिवशी पासुन वारा घालणे सुरु झाले होते. मृग नक्षत्र दमदारपणे बरसल्याने हवेत गारवा निर्माण झाल्याने देवीस वारा घालणे बंद करण्यात आले.


 
Top