धाराशिव (प्रतिनिधी)-आज एन.व्हि.पी शुगर प्रा.लि.जागजी येथिल पहिल्या गळीत हंगामाचा मिल रोलर पुजन कारखान्याचे मार्गदर्शक सौ. जयश्री व आप्पासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.

गेल्या वर्षी पहिला चाचणी हंगाम घेण्यात आला होता, यामध्ये पूर्ण क्षमतेने 1,12,000 मे.टन गाळप करण्यात आले आहे. यावर्षी पाऊस काळ चांगला पडण्यास सुरू झाला असल्याने किंबहुना शेतकऱ्यांनी सुद्धा यंदा ऊस लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. या हंगामात पुर्ण क्षमतेने कारखाना चालवून 1 लाख 50 हजार मे.टन गाळप करण्यात येईल. तोडणी-वाहतुकीचे करार पुर्ण करुन घेऊन हंगाम वेळेत सुरु करण्यात येणार आहे. अशी ग्वाही चेअरमन बालाजी पाटील यांनी दिला. याप्रसंगी कार्यकारी संचालक अमृता पाटील, कृष्णा पाटील, मुख्य शेतकी अधिकारी जयवंत रोहिले, चिफ इंजिनिअर मोकाशे, मे.चिफ केमिस्ट बिक्कड, पॅन इंचार्ज राजेंद्र शिंदे, प्रविण पाटील, अजय गाडे, सह सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

 
Top