तुळजापूर (प्रतिनिधी) -तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील कपडे शिवणकाम करुन कुंटुंबाची गुजरान करणाऱ्या टेलरींगचा  व्यवसाय करणाऱ्या एका तुळजापूरच्या नवोदीत  साहित्यिक  देविदास सौदागर  यांनी लिहिलेल्या  उसवण या कादंबरीला साहित्य अकादमीच्या 'युवा पुरस्कार' जाहीर झाला आहे तिर्थक्षेञ तुळजापूर ही कलाकरांची भूमी म्हणून परिचीत होती. ती आता साहित्यिकांची भूमी म्हणून ओळखली जाणार आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत टेलरिंगचे काम करत आपला लेखनाचा छंद जोपासत दर्जेदार साहित्य निर्मिती करणाऱ्या देविदास याचावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. देविदास सौदागर यांची परिस्थिती अतिशय गरीब असल्याने कुटुंबाचा उदारनिर्वाहसाठी टेलरिंग दुकान मंगळवार पेठ येथे थाटले. टेलरिंग व्यवसाय करीत असताना अचानक कोरोना संकट आले. त्यामुळे टेलरींग चरितार्थाचे साधन बंद झाले. दुकान बंद केले. कोराना काळात झालेल्या हालहापेष्टा  सहन करीत असताना  जागतिकीकरण व यांत्रिकीकरण यामुळे टेलरिंग व्यवसायापुढे अनेक आव्हाने उभी राहिली. परिणामी रेडीमेड कपड्यांची खरेदी वाढल्याने व्यवसायात जे बदल झाले त्यात टेलरींग करणाऱ्यांचा व्यवासाय गंडातर आले. याच अनुषंगाने त्यांनी “उसवण“ ही कादंबरी लिहली आहे. या कांदबरीचे प्रकाशन 2022 मध्ये एका दुकानात अंत्यत साधेपणाने केले. आज याच कांदबरीने साहित्य क्षेत्रात अत्यंत सन्मानाच्या समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमीचा पुरस्कार सौदागर यांना मिळवुन दिला झाला ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. 

 
Top