धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील घडलेल्या गुन्ह्याच्या तपास कामी व फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पेट्रोलिंग करण्यासाठी पोलिस पथक निघाले होत्रे त्यावेळी मोबाईल टॉवरची केबल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना रंगेहाथ पोलिस पथकाने पकडले.

धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून मालाविषयक गुन्हे उघड व पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेणे कामी व गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने हासेगांव येथे बस थांबा येथे आले. पथकास सदर ठिकाणी एका मोटरसायकलवर दोन इसम दोघांचे मध्ये कांहीतरी संशईत सामान घेवून जात असताना पथकास दिसले. त्यांचा पथकास संशय आल्याने पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे तानाजी हरी काळे, वय 46 वर्षे, संतोष तानाजी काळे, वय 22 वर्षे  रा. ईटकुर पारधीपीढी ता. कळंब जि. धाराशिव असे सागिंतले. त्यांनतर पथकाने त्यांना पोत्यामध्ये काय असे विचारले असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्याने पथकाने त्यांचे ताब्यातील सामानाची पाहणी केली. पांढरे रंगाचे खताचे पोत्यामध्ये टॉवरचे केबल मधील जाळलेले कॉपर तार दिसून आली. त्याबाबत त्यांना अधिक विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, एक वर्षा पासून आरसोली, ता. भुम शिवारातील, चिचंपुर ता. भुम शिवारातील, सांगवी मार्डी ता. तुळजापूर व आळणी ता. धाराशिव शिवारातील टॉवरची केबल कट करुन चोरी केली होती. त्या केबल वायर मधील कॉपर तार आहे. असे सांगीतले. आरोपीच्या ताब्यातुन नमुद गुन्ह्यातील मोटरसायकल व कॉपर वायर असा एकुण 84 हजार 250 रूपये किंमतीचा माल जप्त करुन पुढील कार्यवाही कामी नमुद आरोपीस धाराशिव ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात दिले.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सपोफौ काझी, पोह पठाण, औताडे, पठाण, काझी, चालक भोसले यांच्या पथकाने केली आहे.

 
Top