कळंब  (प्रतिनिधी)- गुणवत्ता पूर्ण असलेल्या शाळेतील प्रवेशोत्सव सोहळा निमित्त तालुक्यातील भाटशिरपुरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शनिवार (ता.15) नवगातांचे स्वागत मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी व आमदार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. दरम्यान मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी व आमदार यांनी तालुक्यातील तीन जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी दिल्या देऊन नवगातांचे स्वागत केले आहे. दोन बैलगाड्यामधून नवगातांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

नवगातांचे शाळेतील पहिले ठेवलेले पावलाचे ठसे घेऊन कायमस्वरूपी लक्षात राहील अशा आठवणी साठवणीसाठी शाळांनी उपक्रम राबविले आहेत. 

तालुक्यातील भाटशिरपुरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आमदार कैलास पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष, प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी तालुक्यातील हासेगाव (के) , इटकुर व भाटशिरपुरा येथील जिल्हा परिषद शाळांना भेटी देऊन नवागताचे स्वागत केले आहे. 

आमदार कैलास पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिक्षकाचा धाक पाहिजे, शाळेतील जडणघडण ही काळाची गरज आहे प्रत्येक विद्यार्थी हा एक चांगला माणूस म्हणून समाजात असेल. चांगली पिढी घडविण्याचे काम हे शिक्षक च करत असतात, या भात भाटशिरपुरा येथील शाळेने राज्याच्या पातळीवर नावलौकिक केले आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे यांनी केले, ते म्हणाले की, शंभर टक्के विद्यार्थ्यांचे ठसे घेण्यात आले आहेत. प्रवेश पात्र विद्यार्थ्याची संख्या वाढत आहे. माझी शाळा सुंदर शाळा म्हणून नावारूपाला आलेली ही भाटशिरपुरा येथील  शाळा आहे एक जिल्हाभरात आदर्श अशी शाळा नावारूपाला आली आहे. 

तालुका गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते, शिक्षण विस्तार अधिकारी सुशील फुलारी, ग्रामसेवीका लक्ष्मी सोनवणे, सरपंच सुनिता वाघमारे, चेअरमन  अच्युत गायकवाड, पंचायत समिती सदस्य रामहरी मुंडे,  उपसरपंच सूर्यकांत खापे, शालेय समिती अध्यक्ष प्रियांका गायकवाड आदींची उपस्थिती होती. यावेळी सर्वांनी पहिली च्या वर्ग शिक्षिका प्रमोदिनी होळे यांचेही कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन तामाने,श्रीकांत शिंदे,अमोल बाभळे,शहाजी बनसोडे ,राजाभाऊ शिंदे,लिंबराज सुरवसे,श्रीमती रंजना शिंदे उपस्थित होते.

 
Top