तुळजापूर (प्रतिनिधी)- ग्रीष्म ऋतूतील वाढत्या उन्हापासून श्री तुळजाभवानी मातेस  शीतलता थंडावा मिळावी, यासाठी दरवर्षी चैत्र पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी पासुन ते मृग नक्षत्राचा दमदार पर्जन्यवृष्टी होईपर्यंत दररोज दुपारी एक ते चार या कालावधीत देविस पंख्याने वारा घालण्याची परंपरा आहे. याची सांगता मृग नक्षत्र दमदारपणे बरसल्याने सोमवार दि. 10 जून रोजी करण्यात आला.

श्रीतुळजाभवानी मातेस मखमली पंख्याने वारा घालण्याचा धार्मिक  विधी परंपरेस 10 एप्रिल पासून सुरुवात करण्यात आली होती. या पुजेची सांगता दि. 10 जून रोजी करण्यात आली. मागील वर्षी देविस पंख्याने वारा घालणे विधी दमदार पर्जन्यवृष्टी उशीरा झाल्याने एक महिना उशीरा सांगता झाला होता. उन्हाळ्यात देविस दुपारी एक ते चार या कालावधीत मखमली पंख्याने सलग तीन तास वारा अखंडीत पणे घातला जातो. श्री तुळजाभवानी मातेस उन्हाळ्यात असाह्य उन्हाचा त्रास होऊ नये, त्याची तीव्रता कमी व्हावी, थंडावा मिळावा या भावनेतून हा विधी परंपरा जुनी आहे.त्याचे आजही परंपरे नुसार पालन केले जाते.

 
Top