तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा संघर्ष योध्दा  मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेवुन तात्काळ मागण्या मान्य करावेत. यात मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास शासन जबाबदार राहील असा इशारा निवेदनाद्वारे तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांना देण्यात आला आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, दिनांक 08 जुन 2024 पासुन मराठा संर्घष योध्दा मनोज  जरांगे-पाटील हे आंतरवली सराटी येथे उपोषणांस बसले आहेत. त्यांच्या उपोषनाला पाठींबा म्हणुन सकल मराठा समाज तुळजापूर यांच्या वतीने तहसिलदार तुळजापूर यांना निवेदन देत आहोत. तसेच मनोज जरांगे-पाटील, यांचे आंदोलन हे त्यांच्या सर्व मागण्या पुर्ण करुन तात्काळ आंदोलन स्थगित करावे. अन्यथा मनोज जरांगे-पाटील यांच्या जिवाचे बरे वाईट झाल्यास सर्वतोपरी शासनाची राहील. त्यानंतर ही आंदोलन स्थगित नाही झाल्यास मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्रभर उग्र अंदोलन करेल. याची सर्वतोपरी जबाबदारी शासनाची असेल असा इशारा निवेदनात दिला आहे.  यावेळी महेश गवळी, आबासाहेब कापसे, अजय सांळुके, प्रशांत अपराध, कुमार टोले, अण्णा क्षिरसागर, दत्ता सोमाजी, अक्षय साळवे, धनाजी साठे, धर्यशिल दरेकर, चेतन पांडागळे, बापु परदेशी, प्रशांत गरड, विकास भोसले, तुकाराम ढेरे, राजकुमार परदेशी यांनी दिले.

 
Top