भूम (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाताना दोन आणि येताना एक अशा तीन प्रमुख पालख्या जातात. यावर्षीही या तिन्ही पालख्यांच्या मार्गात रस्त्याचे कामे अर्धवट असल्याने मोठ्या प्रमाणावर रस्ते खराब असल्याने या खराब रस्त्यातून आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचे हाल होणार आहेत. 

याबाबत सविस्तर तालुक्यातून संत एकनाथ महाराज, संत मुक्ताबाई या दोन पालख्या पंढरपूरवारीसाठी प्रस्थान करतात. तर संत गजानन महाराजांची पालखी ही परतीच्या मार्गाने होऊन तालुक्यातून जाते. भूम शहरातून व तालुक्यातून आषाढी वारीसाठी जवळपास लहान मोठ्या 50 पालख्या श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जात असतात. यामध्ये प्रामुख्याने संत एकनाथ महाराजांची पालखी ही खर्डा, तींत्रज, देवगाव, दांडेगाव, परंडा मार्गे पंढरपूरकडे जाते. हा रस्ता 45 किलोमीटर सिमेंटचा मंजूर झाला असून अद्याप त्याचे काम चालू झाले नाही. तसेच सध्या आहे त्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती खड्डे पडल्याने वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना खड्ड्यातून मोठी कसरत करून प्रवास करावा लागत आहे.

संत मुक्ताबाईची पालखी सरमकुंडी फाटा येथून  येते. सरमकुंडी फाटा ते भूम काही ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट झाले आहे. तर काही ठिकाणी रस्त्याला खड्डेच आहेत. त्यामुळे संत मुक्ताबाई पालखीचा प्रवास यावर्षी खड्यातून होणार आहे. तर परतीचा प्रवास करणाऱ्या श्री गजानन महाराज पालखी भूम मार्गाने जाताना ही भूम ते सरमकुंडी या मार्गावर मोठे खड्डे असल्याने त्यांनाही खड्ड्यातून जावं लागणार आहे. हे वारकरी बांधव आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी श्री क्षेत्र शेगाव, श्री क्षेत्र मुक्ताईनगर, श्री क्षेत्र पैठण येथून पायी वारीसाठी येत असतात. पण खराब रस्त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान गतिमान सरकारचा गाजावाजा करणाऱ्या महायुतीच्या सरकारने भूम तालुक्यातून जाणाऱ्या पालखी मार्गासह इतर मार्गावर तात्काळ लक्ष देऊन वारकऱ्यास सर्वसामान्य नागरिकांचे होणारे हाल थांबवावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.


संत एकनाथ महाराज पालखी मार्ग 45

 किलोमीटरचा मंदिर असून हा रस्ता असून लवकरच या रस्त्याचे काम चालू होणार आहे. अशी माहिती शाखा अभियंता अशोक बोराटे यांनी दिली.


वारीसाठी भूम शहरात जाणाऱ्या सर्व छोट्या-मोठ्या दिंड्यासाठी भूम येथील संत गजानन महाराज व्यापारी सेवा मंडळाच्यावतीने राहण्यासाठी संत गजानन महाराज मंदिर परिसरात सर्व वारकऱ्यांची राहण्याची व ज्या वारकऱ्यांची जेवणाची सोय नाही अशांची सोय यावर्षीपासून करण्यात येणार असल्याची माहिती गजानन महाराज व्यापारी सेवा संघाचे अध्यक्ष दिलीप गाढवे व सचिव दीपक खराडे यांनी दिली आहे.

 
Top