भूम (प्रतिनिधी)- डॉ.राहुल भिमराव घुले यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.19 जून 2024 रोजी मौजे बेदरवाडी ता.भूम येथे गुरुवर्य भिमराव बाबुराव घुले व डॉ.अमोल भिमराव घुले यांच्या हस्ते 76 जेष्ठ नागरिकांना मोफत आधाराच्या काठीचे वाटप करण्यात आले. 

गुरुवर्य श्री भिमराव घुले सरांच्या हस्ते ग्रामदैवत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन करून काठी वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने श्री भिमराव घुले सरांचा व डॉ.अमोल भिमराव घुले यांचा जेष्ठ नागरिकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब वनवे, सुरेश घुले, रविंद्र घोळवे, यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बेदरवाडी येथे सुरू असलेल्या हनुमान मंदिर बांधकामाची गुरुवर्य भिमराव घुले व डॉ.अमोल घुले यांनी पाहणी केली. यावेळी सुरू असलेल्या सर्व उपक्रमांबद्दल बेदरवाडी ग्रामस्थांनी भूमिपुत्र डॉ.राहुल घुले यांचे आभार व्यक्त केले.


 
Top