भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील पाथरूड येथील विद्यार्थिनी स्नेहा दुधाळ हिने नृत स्पर्धेमध्ये सिंगापूर, थायलंड, अयोध्या ऑल इंडिया नॅशनल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल भूम तालुका पत्रकार संघाच्यावतीने उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांच्या हस्ते भूम येथील शासकीय विश्रामगृह येथे दुधाळ हिचा सत्कार करण्यात आला.

स्नेहा दुधाळ ही पाथरूड सारख्या ग्रामीण भागातून नृत्य स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय नृत्य सादरीकरण करून धाराशिव जिल्ह्याच्या नावलौकिक केल्याबद्दल उपविभागीय अधिकारी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी धनंजय शेटे, अरविंद शिंदे, आशिष बाबर, अरुण देशमुख, अजित बागडे, प्रल्हाद आडागळे, तानाजी सुपेकर आदी यावेळी उपस्थित होते.

 
Top