धाराशिव (प्रतिनिधी)-पाणी बचत, पाण्याचे महत्व आणि वृक्षारोपण या त्रिसूत्रीचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार व्हावा यासाठी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव या ठिकाणी युनिसेफ स्मार्ट रेडिओ किराणा 90.4 एफएम आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने युवा जल संवर्धन संमेलन आणि हंडाजी पाणी बचाव अभियान दिनांक 10 जून 2024 रोजी आयोजित करण्यात आले. 

या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि पाहुण्यांना वृक्ष देऊन करण्यात आली. या प्रसंगी पाण्याचे महत्व आणि वृक्षारोपण याविषयी विविध मान्यवरांकडून उपस्थिती युवामित्रांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेडिओ तेरणाचे स्टेशन डायरेक्टर संजॉय मैंदर्गी यांनी केले. आपल्या प्रास्ताविकपर भाषणात  पाणी व्यवस्थापन ही काळाची गरज  असून असे उपक्रम रेडिओ तेरणा 90 .4 एफएम वरती सतत चालू असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर सर्वांनी अशा उपक्रमात सहभागी होण्याचं आव्हान त्यांनी केले. या प्रसंगी बोलताना तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने  म्हणाले की , पाणी हे जपून वापरण ही काळाची गरज असून  शेती व्यवस्थापन करतानाही योग्य काळजी घेतली पाहिजे. पुढे बोलताना डॉ.माने म्हणाले की,  शुद्ध पाणी हे पावसापासून मिळते. त्याची साठवणूक करून त्याचा वापर केला तर जमिनीचा कस राखला जातो. आणि उत्पादन ही वाढले जाऊ शकते. याच कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र येथील प्रा. डॉ. नितीन पाटील यांनी धाराशिव नावाचा इतिहास तसेच येथील भौगोलिक पाण्याची रचना त्याचबरोबर  पाण्याला वय असतं आणि पाणी कधीच शिळं होत नसल्याचे सांगितले. तसेच पाणी वापराची पंचसूत्री ही त्यांनी विशद केली.

या आयोजनामध्ये युनिसेफचा  महत्त्वाचा सहभाग ठरला. यावेळी यूनिसेफ कार्यक्रम अधिकारी बालाजी अनिल वरकट यांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंट कोर्सेस त्याचबरोबर कोणत्या बाबीसाठी आपण किती पाणी वापरतो याचबरोबर हंडाजी पाणी बचाव अभियान कसं आहे , त्याची संकल्पना त्यांनी व्यक्त केली. आणि आपण पाणी कसे वाचवू शकतो याच बरोबर याबद्दल त्यांनी सविस्तर अशी  माहिती दिली.  सामाजिक कार्यामध्ये विविध उपक्रम  राबवण्याची परंपरा असलेल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील 122 विद्यार्थ्यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण महाराष्ट्र शासन व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेल्फ प्लेस्ड (स्वयंगती) कोर्स पूर्ण केला.तसेच उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग  , युनिसेफ महाराष्ट्र त्यांच्या सहकार्याने व्हाय वेस्ट ॲप द्वारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एक व्यासपीठ तयार करुन माध्यमातून विद्यार्थ्यांना जलसंधारणाची आवड निर्माण व्हावी हा यामागील प्रयत्न आहे. आतापर्यंत या ॲपद्वारे जवळपास 100 पेक्षा अधिक विद्यार्थी जोडून घेतले आहेत. चार महिन्यातल्या या प्रयत्नामध्ये तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाने धाराशिव जिल्ह्यामध्ये सहावा क्रमांक मिळवला आहे. जलसंधारणाची मोठी चळवळ उभारण्याची ही सुरुवात आहे तसेच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये  व्हाय वेस्ट ॲपद्वारे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि एकत्रितपणे पाणी , पर्यावरण आणि शाश्वतता यावर काम करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे.

युनिसेफ फॉर एवरी चाइल्ड सेंटर फॉर सोशल अँड बिहेवियर चेंज कम्युनिकेशन या कार्यक्रमांतर्गत रेडिओ तेरणा 90.4 एफएम  एक मालिका आमची उर्मिला तयार करून लोकांपर्यंत पोहोचवली. यामध्ये महाराष्ट्रातून रेडिओ तेरणा 90.4 ला  द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देखील मिळाले. या कार्यक्रम प्रसंगी प्रा. अभिजीत कदम यांनी ग्रीन क्लब संकल्पना आणि व्हाय वेस्ट ॲप याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रीन क्लबच्या सदस्या संध्या पवार यांनी केले. तर आभार रेडिओ तेरणा  90.4 एफएम चे प्रोग्राम मॅनेजर रमेश पेठे यांनी मानले.  या कार्यक्रम प्रसंगी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनींचा मोठा प्रतिसाद लाभला. आणि एकूणच हे युवा जल संवर्धन संमेलन आणि हांडाजी पाणी  बचाओ अभियान यशस्वी ठरले.


 
Top