सोलापूर  (प्रतिनिधी)- रेल्वे प्रवाशांना तिकिटासाठी लांब रांगेत थांबावे लागू नये यासाठी रेल्वे विभागाने युटीएस या अँप ची निर्मिती केली. सोलापूर रेल्वे विभागातून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यानी या अँप चा वापर करून आपला प्रवास सुखद बनवला आहे. जानेवारी 2024 ते मे 2024 या पाच महिन्यांच्या कालावधीत 31 हजार इतकी  युटीएस अँप वापरून तिकिटे काढली गेली.जवळपास 1.60 लाख इतक्या प्रवाशांनी प्रवास केला त्यातून 40 लाख रुपये इतका महसूल सोलापूर रेल्वे विभागाच्या खात्यात जमा झाला. 

तिकीट आरक्षित नसताना प्रवाश्याना प्रवास करणे हे जोखमीचे बनते. प्रवाश्यांचा वेळ वाचावा यासाठी सोलापूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री. योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर विभागातील विविध रेल्वे स्थानकावर यासांबांधीचे आवाहन व  जनजागृती करण्यात येत आहे . युटीएस मोबाइल अँप मधून प्रवाशाची तिकिटे ,जनरल तिकीट, सिझन तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट हि पपेरलेस म्हणजेच डिजिटल स्वरूपात मिळतात. तंत्रज्ञानाशी साद घालत आणि रेल्वे विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत येणाऱ्या काळात अनेक प्रवासी युटीएस अँप चा वापर करून आपला प्रवास सुखकर बनवतील. 


युटीएस अँप कसे डाऊनलोड कराल?

आपल्या घरून किंवा कामाच्या ठिकाणाहून कुठूनही आपण हे अँप डाउनलोड करू शकता .  


जर तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तर प्ले स्टोअर ला जाऊन हे अँप डाउनलोड करून संबंधित व्यक्तिगत माहितीचा तपशील भरून आपल्या मोबाइल नंबर वर लॉग इन करावे. 

लिंक -https://play.google.com/store/apps/details?id=com.cris.utsmobile


जर तुम्ही आयओएस युजर असाल तर अँप स्टोअर ला जाऊन हे अँप डाउनलोड करून संबंधित व्यक्तिगत माहितीचा तपशील भरून आपल्या मोबाइल नंबर वर लॉग इन करावे. 

लिंक - https://apps.apple.com/in/app/uts/

 
Top