कळंब (प्रतिनिधी)- शेतात म्हशी चरत असताना अचानक वादळ आल्याने लाईटच्या तारा तुटून जमिनीवर पडल्या त्या तारेला दोन मशीन चिटकून दगावल्याची घटना कळंब तालुक्यातील सात्रा येथे घडल्याने या घटनेत शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाले आहे . 

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे शेतात जनावरे इकडे तिकडे चारा खाण्यासाठी भटकंती करत असतानाच सात्रा येथे वीज वाहिनीची वादळामध्ये तार तुटून जमिनीवर पडली यातच शिवाजी उद्धव शिंदे यांच्या मुरा जातीच्या दोन म्हशी या तारेला चिटकून जागीच मरण पावल्या ही घटना 8 जून रोजी दुपारी दोन वाजता घडली असून यामध्ये शिवाजी शिंदे यांचे जवळपास अडीच लाख रुपयाचे नुकसान झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे यामध्ये त्यांना अद्याप प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळाली नसल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे .  तर या वीज तारेला म्हैस चिटकल्याने त्यांना वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवाजी शिंदे यांनी केली आहे.

 
Top