तेर (प्रतिनिधी)- हाती घेतलेले काम पूर्ण करण्याची धमक तेर येथील रेवणसिद्ध लामतुरे यांच्यामध्ये आहे,असे प्रतिपादन श्री शैल्य पिठाचे जगद्गुरु श्री श्री श्री डॉ. चन्नासिद्धराम  शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले. 

धाराशिव तालुक्यातील तेर येथील तगर अभ्यासक रेवणसिद्ध लामतुरे यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता सोहळा व“दीपस्तंभ“ गौरव ग्रंथाचे प्रकाशन धाराशिव येथे झाले. या आयोजित कार्यक्रम प्रसंगी महास्वामीजी यांनी प्रतिपादन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीगुरु हभप गहिनीनाथ महाराज औसेकर होते. तर श्री श्री 108 श्री गुरु शांतविरलिंग शिवाचार्य महाराज औसेकर यांचे उत्तराधिकारी, आमदार राणाजगजितसिंह पाटील, हभप नामदेव महाराज वासकर, हभप ज्ञानेश्वर महाराज देशमुख, हभप प्रमोद महाराज जगताप, हभप दीपक महाराज खरात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अरविंद गोरे, डॉ. महेंद्र कल्याणकर, व्ही. व्ही. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.                              

कार्यक्रमाचे प्रस्ताविक हभप दिपक महाराज खरात यांनी केले. यावेळी व्ही. व्ही. गायकवाड, डॉ. महेंद्र कल्याणकर, अरविंद गोरे, डॉ. वृषाली वारद, आमदार राणाजगजितसिंह पाटील, रेवणसिद्ध लामतुरे, हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र केसकर यांनी केले. तर आभार नंदकिशोर लामतुरे यांनी मानले. यावेळी रेवणसिद्ध लामतुरे यांचा श्रीशैल्य पिठाचे जगद्गुरू श्री श्री श्री 1008 डॉ. चन्नसिद्धराम शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व दीपस्तंभ गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कृतज्ञता सोहळा निमित्ताने खा. ओमप्रकाश निंबाळकर,आ. कैलास पाटील यांनीही रेवणसिद्ध लामतुरे यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी रेवणसिद्ध लामतुरे  यांच्याकडून आदर्श काम कसं असावं याची प्रेरणा युवकांनी घ्यावी असे आवाहन केले.

 
Top