उमरगा (प्रतिनिधी)- विकासाच्या मुद्द्याऐवजी सोयाबीन, कांदा आदीसह शेतीमालाचे घसरलेले दर, महागाई, बेरोजगारी, यंत्रणांचा गैरवापर, पक्ष फोडाफोडी या बाबींसह संविधान बदलण्याची वावडीने मागासवर्गीय समाज, तीन तलाक व काश्मीरचे कलम 370 यासह देशात सीएए कायदा लागू करण्याची भाजपाची भूमिका यामुळे मुस्लिम समाजाच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. तसेच मराठा आरक्षणाचा रोष यामुळे ओमराजे निंबाळकर यांना उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातून 43 हजार 943 मतांची लीड मिळाली आहे. नेते विरुद्ध मतदार अशी जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली होती. सहा महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे बनोबल वाढले आहे. महायुतीच्या अर्चना पाटील यांना 62 हजार 725 मते मिळाली. तर महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर यांना 1 लाख 6 हजार 669 इतकी मते मिळाली. त्यामुळे महाविकास आघाडीचे मनोबल उंचावले आहे.

तर संविधान बदलले जाण्याची भिती व काँग्रेसच्या अध्यक्षपदी खरगे यांची निवड झाल्याने मागासवर्गीय समाज महाविकास आघाडीच्या बाजुने एकलटला होता. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे हा मुद्दा या निवडणुकीत अग्रभागी होता. आंतरवलीमध्ये झालेला लाठीचार्ज, मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काळा दिवस पाळण्याचे केलेले आवाहन हे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल करुन मराठा तरुणांना महाविकास आघाडीकडे खेचण्यात यश मिळवल्याचे मतमोजणीनंतर दिसून येत आहे. सोयाबिनसह शेतीमालाचे पडलेले दर, कांदा निर्यात बंदी, खत व बियाण्यांचे वाढलेले दर, महागाई, बेरोजगारी, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसचे वाढलेले दर, खोटी आश्वासने, पक्ष फोडाफोडी या बाबींसह मराठा आरक्षणाचा मुद्दा, संविधान बदलण्याची वावडी व मुस्लिम समाजाच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करुन त्याचे मतदानात रुपांतर करण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली आहे. निष्ठावंत उमेदवार, सर्वसामान्यांशी थेट संपर्क आदीसह विविध कारणांमुळे मिळालेल्या मताधिक्यामुळे सहा महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे बनोबल वाढले आहे.

 
Top