तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर विधानसभा मतदार संघातुन भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी  महाविकास आघाडी तयारी करीत असुन त्याला यश येत असल्याचे दिसुन येत आहे.

तुळजापूर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी उमेदवार खासदार ओमराजे यांना पन्नास हजाराचा वर मताधिक्य मिळताच आक्रमक होत ओमराजे यांनी तुळजापूर विधानसभा मतदार संघातुन महाविकास आघाडी उमेदवार विजयी करुन शिवसेना प्रमुख कै बाळासाहेब ठाकरे यांचे  श्रीतुळजाभवानी नगरीवर भगवा फडकावून त्यांचे स्वप्न पुर्ण करणार असे नुकतेच जाहीर केले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी महाविकास आघाडी उमेदवार निवडुन आणण्यासाठी प्रयत्न करणार असे जाहीर केले होते. हे प्रत्यक्षात उतरविण्यासाठी खासदार ओमराजे कामाला लागल्याचे दिसुन येत आहे. भाजप मधील सहकार क्षेत्रातील सर्वार्थाने सक्षम असणाऱ्या एक युवा नेते यासाठी आपल्याकडे खेचण्यास प्रयत्न सुरु केला असून त्यास यश ही मिळत असल्याचे समजते. त्यामुळे लवकर या युवा नेत्याने तिर्थक्षेञ तुळजाभवानी दारी मशाल हात घेतल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण  नाही. या बाबतीत दोन ते तीन बैठका झाल्याचे समजते.

माञ येथील जागेसाठी काँग्रेस कडुन खुद्द माजी मंञी मधुकर चव्हाण इच्छुक  असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर आगामी काळात तुळजापूर विधानसभा मतदार संघात बरीच राजकिय उलथापालथा होण्याची शक्यता आहे. तुळजापूर विधान मतदारसंघातून एका संभाव्य उमेदवारांनी तयारी सुरु केली आहे. या  विधानसभा मतदारसंघात सध्या संभाव्य उमेदवारांची संख्या वाढत चालली आहे. तर दुसरीकडे मात्र एक संभाव्य उमेदवार बैठका पर्व सुरू केल्याचे दिसत 

आहे.

धाराशिव जिल्हयातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघ एकमेव मतदारसंघ भाजप ताब्यात आहे. हा जिल्हयातील महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो. सध्या या  परिसरात हा उमेदवार कोण? असेल याची चर्चा मात्र राजकीय, सामाजिक क्षेत्रातील जोरदार चालू आहे. तर संभाव्य उमदेवार मात्र संभ्रमात पडले असल्याचे बोलले जात आहे.


 
Top