भूम (प्रतिनिधी)-आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून व सार्वजनिक आरोग्य विभाग धाराशिव व भैरवनाथ उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमानाने भूम तालुक्यातील व परिसरातील नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करून शस्त्रक्रिया आवश्यक असणाऱ्या 23 रुग्णाची  नेत्र शस्त्रक्रिया करण्यासाठी पुणे येथील देसाई हॉस्पिटलला रवाना करण्यात आले. याप्रसंगी आरोग्यदूत पांडुरंग धस, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल शृंगारे, आरोग्य कर्मचारी, उपस्थित होते.

 
Top