धाराशिव (प्रतिनिधी)-तालुक्यातील पळसप येथील न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूल या शाळेत जागतिक योगदिनानिमित सकाळी सर्व विद्यार्थ्यांचा योग अभ्यास व प्रात्यिक्षे करून घेण्यात आली. या वेळी मुख्याध्यापिका पूजा जाधव, आश्विन देशमुख ,शिक्षकवृंद ,पालक व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना पूजा देशमुख यांनी योगाचे आजच्या काळात किती महत्वाचे स्थान आहे ते उपस्थितांना समजाऊन सांगितले. मनुष्याच्या जीवनात त्याची शारीरिक संपत्ती जपण्यासाठी योगासारखा नियमित व्यायाम करणे गरजेचे असल्याचे सूतोवाच केले. बालकांना या वयापासून योगाचे प्रशिक्षण दिल्यास भविष्यातील देशाचे नागरिक सक्षम व कार्यक्षम घडतील, त्यामुळे प्रत्येक बालक व पालक यांनी नियमित योगाभ्यास करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम मागर यांनी केले. तर आभार परविन पटेल यांनी मानले.

 
Top