तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मसला खुर्द शिवारातील काटी रस्त्यावरील परिसरातून  एका ओढ्यातून रविवार पासून (दि. 9) वाहणाऱ्या निळसर पाण्याचे गुढ वाढले आहे. हे निळेसर पाणी कसे बनले याची उत्सुकता पंचक्रोषीत निर्माण झाल्याने याच्या तपासणीतुन  निळसर पाण्याचे रहस्य बाहेर येणार आहे.

सध्या हे निळसर पाणी वाहतच आहे. त्यामुळे या पाण्याची तपासणी करण्याची मागणी होत आहे. पण  ग्रामपंचायत प्रशासन या बाबतीत टाळाटाळ करीत असल्याचा आरोप केला जात आहे. या पाण्याबाबतीत तालुक्यात अनेक चर्चला उधाण आले आहे. प्रथमता  निळसर पाणी वीज पडल्यामुळे येत असल्याचे सांगण्यात आले. नंतर रंगाचा डबामुळे पाणी वाहत असल्याचा चर्चा झाली. मंगळवार निळसर काची रंगाचा बाँक्स तिथे पडलेला असुन त्यामुळे निळसर पाणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. निळ्या रंगाचा वाहणाऱ्या पाण्या बाबतीत वेगवेगळ्या चर्चा पुढे येत आहे. रंगाचा बाँक्स कुणी कशासाठी टाकला याचा शोध घेणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे या निळसर पाण्याचे गुढ वाढतच चालेले आहे. सदरील रस्ता हा आडमार्गाला असल्याने या निळसर पाण्याचे गुढ वाढले आहे. रविवार सांयकाळ पासुन निळसर रंगाचे पाणी वाहत असुन ते आजही वाहतच आहे.


रंगबाँक्समुळे निळसर पाणी -तहसिलदार 

या बाबतीत तहसिलदार यांना विचारणा केले असता त्यांनी सांगितले की, तेथील सरपंचाने तिथे जावुन पाहणी करुन सदरील पाणी बाँक्स मधील रंगाचे असल्याचे सांगितल्याची माहीती दिली.

 
Top