तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या वैशाख उटीवारिनिमीत्त चंदनापासून तयार केलेल्या श्री संत गोरोबा काका यांची मुर्ती उजळून दिसतं होती.

श्री संत गोरोबा काका यांना वैशाख महिन्यात उन्हाळ्यामुळे थंडावा वाटावा म्हणून अक्षय तृतीया पासून वैशाख एकादशी पर्यंत चंदनाची उटी उगाळली जाते .ती उटी साधारणतः अडीच किलो उटी उगाळली जाते.वैशाख एकादशीचे  हभप बाळासाहेब महाराज देहूकर यांचे किर्तन झाल्यावर श्री संत गोरोबा काका यांना मानाचा पतंगे कूटूंबांचा अभिषेक झाल्यानंतर चंदनाच्या उटीपासून श्री संत गोरोबा काका यांची मुर्ती तयार करण्यात आली.यानंतर  हभप बाळासाहेब महाराज देहूकर यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर मुर्ती दर्शनासाठी उघडण्यात आली.यानंतर हजारो भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच रांग लावली होती.मिळेल त्या वाहनाने भाविक भक्त दर्शनासाठी येत होते.

 
Top