तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील सावता माळी मंदिर ते निळा झेंडा चौक पर्यंतचा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष (ग्रामिण ) दत्ता कांबळे व डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्ष (शहर) अभिजित देवकुळे व नागरीकानी तेर ग्रामपंचायत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .               

निवेदनात म्हणाले आहे की ,तेर येथील सावता माळी मंदिर ते निळा झेंडा चौक पर्यंतचा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून रस्त्याच्या आतील लोखंडी सळई बाहेर पडल्याने वाहन धारकास व नागरिकास प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तरी विनंती कि,तेर येथील सावता माळी मंदिर ते निळा झेंडा चौक पर्यंत चा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष (ग्रामिण) दत्ता कांबळे, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष (शहर) अभिजित देवकुळे व नागरीकानी यांनी तेर ग्रामपंचायत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


 
Top