कळंब (प्रतिनिधी)- पतंजली योग समिती कळंब च्यावतीने 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिनांक 15  जून ते 21  जून या कालावधीत हनुमान मंदिर सावरगाव पुनर्वसन येथे पहाटे 5 ते 7   या वेळेत मोफत ध्यान योग प्राणायाम शिबिर चे आयोजन करण्यात आले आहे. 

या शिबिरात प्रसिद्ध योगशिक्षक कळंब भूषण शशिकुमार बाळकृष्ण भातलवंडे, गोपीनाथ फावडे गुरुजी प्रा. डॉ. अनंत नरवडे हे मोफत ध्यान योग प्राणायाम याविषयी मार्गदर्शन व प्रशिक्षण देणार आहेत. तसेच यानंतर विद्याभवन हायस्कूल कळंब येथे नित्य योगाचा वर्ग 5  ते 6 यावेळी सुरू राहील. नित्य योगामुळे आपणास बीपी, शुगर, थायरॉईड,  मोटापा, त्वचारोग, स्त्रीरोग या आजारावर मात करता येते. स्त्रियासाठी प्राणायाम योग ध्यानसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. शिबिरार्थीनी आपल्याबरोबर असं न पट्टी बरोबर आणावी असे आवाहन पतंजली योग समितीचे योगशिक्षक शशीकुमार यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पतंजली योग समितीचे खालील सदस्य परिश्रम घेत आहेत. यात नरसिंग नांदे, महारुद्र हुंडेकरी, वसंत भोरे, अच्युतराव बाराते, के.व्ही. मुंडे, रमेश खोसे, अनिल कुलकर्णी, रामभाऊ बाबर, बळीराम कवडे, नितीन डांगे, गणपती मोराळे, तुकाराम जाधवर, पांडुरंग माळवदे, प्रदीप भिसे ,डॉ. भागवत राऊत, दत्ता रादंड, अर्चना भातलवंडे, राजकन्या गवळी, जयश्री बाराते, अनिता कुलकर्णी, कुंदा हुंडेकरी, विजयश्री वाघमारे, महानंदा पारखे, उषा केंद्रे यांचा समावेश आहे.

 
Top