परंडा (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील वाळू माफियांच्या दोन गटात तुफान राडा झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमध्ये भर दिवसा गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये एक जण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी बार्शीमधील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाळूच्या वादातून दोन गटामध्ये हा वाद झाला. दरम्यान हा वाद पूर्ववैमनस्यातून दोन गटात वाद घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गोळीबारामध्ये कमरेला गोळी लागल्याने योगेश हनुमंत बुरंगे हा गंभीर जखमी झाला. कपिल आजिनाथ अलबत्ते याच्या डोक्यात दगड घातल्याने जखमी झाला आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपी  फरार झाले आहेत. त्यामुळे या फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या संदर्भातील माहिती परंडा पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी दिली.

 
Top