धाराशिव (प्रतिनिधी)- देशातील नामांकित महाविद्यालयापैकी एक असलेल्या हैद्राबाद येथील इंटरनॅशनल इन्स्टीट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये लाखनगाव (ता. वाशी जि. धाराशिव) येथील कुलदीप कुमार लाखे याची एम.टेक.साठी निवड झाली आहे. पीजीईई परिक्षा उत्तीर्ण झाल्याने त्याला प्रवेश मिळाला आहे. धाराशिव येथील सुप्रसिध्द विधिज्ञ कुमार लाखे यांचा कुलदीप हा मुलगा असून त्याच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कुलदीपने पी.जी.ई.ई. परिक्षेत्र नेत्रदिपक यश मिळवून तो उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे देशातील नामांकित महाविद्यालय असलेल्या हैद्राबाद येथील इंटरनॅशनल इन्स्टीट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये कुलदीपला एम. टेकसाठी प्रवेश मिळाला असून कॉम्यूटर सायन्स व इंटेलीजन्स सिक्युरिटी हा विषय असणार आहे. कौतुकास्पद बाब म्हणजे तो देशातून तो 128 व्या रँकने उत्तीर्ण झाला आहे.

 
Top