कळंब (प्रतिनिधी)- येथील शासकीय कार्यालयात अधिकारी चांगले असतील तर रुग्णांना सेवाही तितकीच तात्काळ व योग्य दर्जाची मिळते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.नागनाथ धर्माधिकारी यांनी विविध शस्त्रक्रिया चालू करून रुग्णांना मोठा दिलासा दिलेला आहे. खाजगी दवाखान्यांमध्ये रुग्णांना विविध शस्त्रक्रिया करायच्या म्हणल तर त्यांना 30 ते 50 हजारापर्यंत खर्च होतो. मात्र याच सर्व शस्त्रक्रिया नियोजनबद्ध करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय कळंब येथील डॉक्टर आता सक्रिय झाले असून सर्व रुग्णांना मोफत व व्यवस्थित नियोजन बुद्ध शस्त्रक्रिया या रुग्णालयात उपलब्ध झाल्या आहेत.

2 एप्रिल 2023 पासून ते 31 मार्च 2024 पर्यंत कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती, शस्त्रक्रिया द्वारे प्रसूती, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, बिनटाका शस्त्रक्रिया, हर्निया, अपेंडिक्स, हायड्रोसिल्स, लहान शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, अशा अनेक शस्त्रक्रिया या रुग्णालयात सुरू झालेल्या आहेत. मागील काळात काही वैद्यकीय अधीक्षक आपली ड्युटी बजावून गेले. मात्र अशा कुठल्याही प्रकारच्या शस्त्रक्रिया त्यांनी उपलब्ध करू शकले नाहीत.

 
Top