तुळजापूर (प्रतिनिधी)-मराठा आरक्षणसाठी शासनाला एक महिन्याची मुदत दिली असुन शासनाला मराठ्यांची शक्ती, ताकद दाखविण्यासाठी 10 जुलै रोजी धाराशिव येथे भव्य शांतता रँली काढण्यात येणार आहे. ती यशस्वी करण्यासाठी कामाला लागा असे आवाहन संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी नुकतीच संभाजीनगर येथे सकल मराठा समाजाच्या बैठकीत केले.

छञपती संभाजीनगर येथे जिल्हयातुन जवळपास पन्नास कार्यकर्ते शांतता रँली तयारी बाबतीत मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी  बोलताना म्हणाले कि,  शांतता रँलीत लेकराबाळा सह सहभागी होण्यासाठी घराघरात, गावागावात जावुन शांतता रँलीत सहभागी होण्यासाठी आवाहन करा. शांतता रँलीचे नियोजन करा, आमची बडदस्त ठेवु नका, आम्ही कुठेही थांबु कुणाच्याही घरात जेवु पण मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठा समाज बांधवांसाठी पिण्याचे पाणी सह अन्य सुविधा उपलब्ध करुन मराठ्यांची जरी रँली असली तरी शांतता रँली आहे हे लक्षात घ्या. शांतता रँलीतुन शासनाला मराठ्यांची ताकद दाखविण्याचे आवाहन शेवटी जरांगे पाटील यांनी केले. या बैठकीला धाराशिव, कळंब, तुळजापूर, उमरगा, भूम, वाशी, परांडा येथील मराठा समाज बांधव उपस्थितीत होते.

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत दि. 10 जुलै 2024 रोजी धाराशिव शहरात पार पडणाऱ्या भव्य मराठा आरक्षण संवाद रॅलीच्या पूर्व नियोजनाकरिता नियोजन बैठक रविवार दिनांक 23 जुन 2024 रोजी सकाळी 11 वाजता लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय समर्थ नगर कोर्टाच्या पाठीमागे, धाराशिव  येथे आयोजित केली आहे. तरी या बैठकीस जिल्हयातील मराठा बांधवांनी उपस्थितीत राहण्याचे    आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे.

 
Top