कळंब (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील रासेयो विभागाच्य वतीने शुक्रवार दि.21 जून 2024 रोजी  'आंतरराष्ट्रीय योगादिन' कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयच्या प्रांगणात करण्यात आले होते. 

यावेळी योगगुरु महाविद्यालयाचे प्रा.डॉ.अनंत नरवडे यानी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांना  आजच्या दगदगीच्या जीवनात मानवांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत. त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी योगाचा उपयोग कसा होत आहे याचे महत्व समजावून सांगितले. तसेच सर्वानी योगगुरु अनंत नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारांची योगासने केली. त्यांनी योग व आहार या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील एनएसएस विभाग प्रमुख प्रा.मनिषा कळसकर, आयक्युएसी विभाग प्रमुख डॉ.अनिल जगताप, डॉ.रघुनाथ घाडगे, शिव खबाले,  प्रा.विनायक मिटकरी, प्रा.विजय घोळवे,  प्रा.सोमनाथ कसबे, डॉ.विद्युलता पवार, प्रा.सुनिता चोंदे, जयसिंग चौधरी, संजीव शेंडग, सुंदर कदम, दत्ता गायकवाड तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले.

 
Top