कळंब (प्रतिनिधी)- कळंब न्यायालयाच्या आवारात मुद्रांक विक्रेता नसल्याने वकील व पक्षकरांची तिकीट, बाँड आधी साहित्य खरेदीसाठी मोठी गैरसोय होत असून  याकडे वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष देण्याची गरज आहे. नेमून दिलेला मुद्रांक विक्रेता जर न्यायालयाच्या आवारात बसत नसेल तर त्याच्यावर तात्काळ  कारवाई करावी अशी मागणी  संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तानाजी चौधरी यांनी उप नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक लातूर यांच्याकडे तक्रार केली आहे.  कारवाई न झाल्यास कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

चौधरी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कळंब न्यायालयाच्या आवारात नेमून दिलेला मुद्रांक विक्रेता हे गेल्या सहा ते सात वर्षापासून न्यायालयाच्या आवारात मुद्रांक विक्री करत नसून ते कळंब तहसील कार्यालय व दुय्यम निबंधक कार्यालयाच्या आवारात मुद्रांक विक्री करत असतात. तसेच बँकेचे नोटरी  बनवणे, शपथपत्रे बनवणे इतर कार्यालयाचे कामे करणे यात मुद्रांक विक्रेता यांचे लक्ष असल्याचे दिसून येत आहे. ते पाच रुपयाचे व दहा रुपयांचे टॅम्प टिकीट विक्री करण्यास काटकसर करत असल्याचे दिसून येत आहे. अशा मुद्रांक विक्रेत्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष ॲड. तानाजी चौधरी यांनी अधिकाऱ्याकडे केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. मुद्रांक विक्रेत्याची पाठराखण दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी कोण करतय असा सवाल ही त्यांनी केला आहे. जर या मुद्रांक विक्रेत्यावर 15  दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास कळंब न्यायालयातील सर्व वकील मंडळी हे दुय्यम निबंधक कार्यालय समोर आंदोलन करतील व बेमुदत उपोषणाला बसतील असा इशाराही ॲड. तानाजी चौधरी यांनी यावेळी पत्रात दिला आहे.


 
Top