तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी मातेच्या पुण्य पावनगरीचा या पुर्वीचा तिर्थक्षेत्र विकास आराखडा (अंदाजे 332 कोटी) तील अनेक विकास कामे नियोजन शुन्य व चुकिच्या  निर्णयामुळे  वापराविना पडून आहेत. यात शासनाच्या करोडो रुपयाची नासाडी झाल्याचा आरोप करुन आता धाराशिव व लातूर रोड, पाचुंदा परिसरात विकास कामे करण्याची मागणी पुजारी मंडळ उपाध्यक्ष विपीन शिंदे यांनी विकास आराखडा बैठकीत जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांना निवेदन देवुन केले.

या बैठकीत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, तिर्थक्षेत्री या पुर्वी  बरीच विकास कामे तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत करण्यात आले. त्यातील काही कामे वापराविना धुळखात पडून आहेत. जसे की, भवानी कुंड, पापनास तिर्थ समोरील तलाव सुशोभिकरण, 124 भक्त निवास, घाटशिळ परिसरातील पोलीस संकूल व अशी अनेक मोठया व आवाढव्य विकास कामे ही नियोजन शुन्य व चुकीच्या निर्णयामुळे आज शासनाचे करोडो रुपयाची नासाडी झाली आहे. वास्तविक पाहता  विकास कामे  योग्य त्या ठिकाणी झाली असती तर त्याची देखभाल व भक्तांना वापरासाठी सोयीस्कर झाले असते. 

शहरातील आवश्यक असणाऱ्या सर्व विकास कामे, स्वच्छता, लाईट, पाणी, भाविकांच्या मुलभूत व भौतिक गरजा, दळणवळणाची साधने इ. गोष्टी पारदर्शकपणे करणे गरजेचे आहे. श्री क्षेत्र तुळजापूर विकास आराखडा शहराच्या पुर्व बाजूस म्हणजेच लातूर रोड भागातील जागेत करण्यात यावा. पार्किंग, बोटींग, 108 फुटी भव्य मुर्ती उभारावी  व इतर हा सर्व विकास शहराच्या पुर्व भागात व्हावा. आदीमाय अदिशक्ती मातंगीदेवी मंदीरपासुन ते अरण्यबुवा मठ याभागाची पाहणी करुन येथुन मंदीरात जाण्यासाठी रस्ता कामाचा विकास आराखड्यात समावेश करावा. 

 
Top