भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील गणेगाव येथील जि. प. प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे शिक्षक संतोष दादाराव तोडकरी हे शाळा बाह्य विद्यार्थ्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवित असतात. गरजवंत व अनाथ मुलांना दत्तक घेऊन शिक्षणासाठी नेहमी मदत करीत असतात. आपल्या संघर्ष शील प्रवासातून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मदत केली आहे.

आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या भूमिकेतून त्यांनी व मित्रपरिवाराने त्यांचा वाढदिवस सामाजिक व शैक्षणिक कार्य करणाऱ्या मातृभूमी प्रतिष्ठान, कर्मवीर थाळी, कर्मवीर ग्रंथालय इत्यादी संस्थांना आर्थिक मदत देवून साजरा केला. समाजातील वंचित घटकांचा आपण एक भाग व्हावा म्हणून रक्तदान, वाचन, विद्यार्थी गुणवत्ता विकास चळवळ, शैक्षणिक साहित्य वाटप इत्यादी कार्यक्रम नेहमी राबवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

 
Top