कळंब (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील अथर्डी  येथे श्री शनैश्वर जयंती उत्साहात दि. 6 जून रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. गेल्या 24 वर्षा पुर्वी अथर्डी गावात अनंत चौधरी यांनी स्वखर्चातून या शनिदेवाची विधीवत पुजा करून स्थापना केली. त्यावेळे पासून दर वर्षी शनि जंयती दि. 6 जून रोजी  पूजाआर्चा करून विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी शनैश्वर जयंती निमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे रात्रभर भजन, किर्तन झाले. त्यानंतर आरतीचे आयोजन करण्यात आले होते. दि. 6  रोजी सकाळी 9 वाजता महाआरती करून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.  यावेळी कळंब व वाशी परिसरातील शेकडो भाविक भक्तांनी शनि देवाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.

 
Top