तेर (प्रतिनिधी)-  धाराशिव तालुक्यातील एकात्मिक बाल प्रकल्प कार्यालय अंतर्गत गावात कमी वजनाच्या बालकांची संख्या वाढू लागली आहे. 

तेर येथील एकात्मिक बाल प्रकल्प कार्यालय अंतर्गत तेर ,ढोकी ,उपळा(मा), जागजी, कोंड, खेड, येडशी बीट असून कमी वजनाच्या बालकांमध्ये तेर बीट अंतर्गत 18, ढोकी बीट अंतर्गत 23, उपळा (मा )बीट अंतर्गत 11, जागजी बीट अंतर्गत 16, कोंड बीट अंतर्गत 15, खेड बीट अंतर्गत 19, येडशी बीट अंतर्गत 15 कमी वजनाच्या बालकांची संख्या आहे.

मध्यम कुपोषित बालकांची तेर बीट अंतर्गत 23, ढोकी अंतर्गत 12, उपळा (मा) बीट अंतर्गत 11, जागजी बीट अंतर्गत 11, कोंड  बीट अंतर्गत 10, खेड बीट अंतर्गत 16, येडशी बीट अंतर्गत 2 बालकांची संख्या आहे. तीव्र कुपोषित बालकांची संख्या तेर बिट अंतर्गत 1, ढोकी बीट अंतर्गत 2, जागजी बीट अंतर्गत 3, येडशी बीट अंतर्गत 2 अशी आहे. विशेष म्हणजे तेर येथील एकात्मिक बाल प्रकल्प कार्यालयांतर्गत ढोकी, कोंड, खेड येथील पर्यवेक्षिकेच्या जागा रिक्त आहेत.


कुपोषित टाळण्यासाठी वैयक्तिक व परीसर स्वच्छ ठेवावा. बाजारातील तयार अन्नपदार्थ टाळावेत, आयोडिनयुक्त मिठाचा वापर करावा, मूग, मटकी, हरभरा, वाटाणे, मसूर, मेथ्या यांना मोड आणल्याने अमायलेज तयार होते.त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते.पचनाला विरोध करणारे घटक कमी होतात व जीवनसत्त्व क आणि बी तयार होतात.त्यामुळे गुणवत्ता वाढते.-पी.बी.वलसे, विस्तार अधिकारी, एकात्मिक बाल प्रकल्प कार्यालय,तेर.


 
Top