तुळजापूर (प्रतिनिधी) - नळपट्टी व घरपट्टी माफ करा, या  मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन महाविकास आघाडीने नगरपरिषद  मुख्याधिकारी  लक्ष्मण कुंभार यांना दिले.

मुख्याधिकारी  यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं   आहेकि  दुष्काळी परिस्थिती असल्याने तसेच तुळजापूर शहरताल चार दिवसाआड  पाणी पुरवठा होत असल्याने नागरीकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तरी नगर परिषद मार्फत आकारण्यात येणारी नळपट्टी व घरपट्टी ही पुर्णपणे माफ करण्यात यावी.  हे तिर्थक्षेत्र असल्याने व दररोज लाखो भाविक शहरात येत असल्याने तुळजापूर शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यात यावा. तुळजापूर शहरत अनेक विभागामध्ये स्वच्छता करण्यात येत नसल्याने घाणीचे साम्राज्य परसलेले आहे. तसेच पावसाचे दिवस असल्याने शहरात रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने शहरातील सर्व विभागातील स्वच्छता तात्काळ करण्यात यावी. तुळजापूर शहरात अनेक रहदारीच्या रस्त्यावर मोकाट जनावारांचा वावर असुन त्यामुळे रहदारीसाठी अडचणी येत असल्याने शहरतील मोकाट जनावारांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा. येणाऱ्या भाविकांना मुलभुत सुविधा पुरवण्यात याव्यात.

तरी तुळजापूर शहरातील वरील समस्या तात्काळ सोडविण्यात याव्यात अन्यथा महाविकास आघाडी तुळजापूर शहराच्या वतीने लोकशाही पध्दतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारावजा निवेदन दिले. हे निवेदन महाविकास आघाडीचे अमर चोपदार, शाम पवार, सुधीर कदम, अमोल जाधव, शरद जगदाळे, राहुलजी खपले, सागर इंगळे, विकास भोसले, कालीदास नाईकवाडी, अक्षय कदम, दादासाहेब खपले, दशरथ पुजारी, महेंद्र शिंदे, मघुकर शेळके, रविंद्र साळुंके, धनंजय पाटील,  नवनाथ जगताप, किरण यादव, बापूसाहेब नाईकवाडी, अनमोल साळुंके, संतोष कदम आदीसह महाविकास आघाडीतील पदाधिकारी उपस्थित हेोते.

 
Top